vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारींसाठी-सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल फ्रि क्रमांक उपलब्ध..  

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारींसाठी-सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल फ्रि क्रमांक उपलब्ध..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आदर्श आचारसं‍हितेचा भंग होत असल्‍यास नागरीक cVIGIL अॅपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी दाखल करु शकतात. क्षेत्रिय पथकाद्वारे प्राप्‍त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार १०० मिनिटात निकाली काढण्‍यात येते. त्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहायही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बंदुक/पिस्‍तुल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्‍तेचे विद्रुपन, बनावट बातमी, मतदारांची वाहतुक, भेटवस्‍तू वाटप, पेड न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी इत्‍यादी प्रकार होत असल्‍याचे निदर्शनास आल्यास नागरिक अशा घटनांचे cVIGIL अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड करुन ऑनलाईन तक्रारी दाखल करु शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर ,नागपूर येथे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी

राज्यात पोलिसांसाठी घरे उभारणार,मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आश्वासन

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज-मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्‍या, गडचिरोतील 26 फेऱ्या आणि अहेरीत 22 फेऱ्यानिवडणूक निरीक्षक यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

कापुरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत साई जलाराम प्रतिष्ठान तर्फे गोपाळकाला निमित्त दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त या परिसरातील वाहतुकीत दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ 22.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

vishwatmaklokswamivarta