vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संकल्प नववर्षाचा*    *’सेल्फी विथ गोवंश, गो-पालक’*

🌾🐄🌾🐄🌾🐄🌾🐄🌾

*संकल्प नववर्षाचा*    *’सेल्फी विथ गोवंश, गो-पालक’*

 

*.. आता वाटचाल विषाकडून अमृताकडे..*

 

*नवनवे विषाणू मानवावर आक्रमण करीत आहेत. एवढ्या वैज्ञानिक प्रगतीनंतरही यामुळे मानवी मन चिंताग्रस्त झालेय. तेव्हा ‘जुने तेच सोने’ होते का यावरही चिंतन हवे.*

*आज नैसर्गिक शेतीचे महत्त्व सर्वांना पटलेय. सरकारी पातळीवरही त्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण समाजाची साथ हवीय.*

*आमचे दैवत श्रीकृष्ण असो वा दत्तगुरु यांनी गाईचे महत्त्व सांगितले आहे. गाय असो वा बैल यांच्याविषयीचा पुज्यभाव आजही कायम आहे.. उपयोगीता सर्वांना मान्य आहे.*

*आज दिवसांगणिक शेतजमीन कमी होत आहे. शहरात तर पायाला माती पण लागत नाही अशी अवस्था आहे. पण गोबारस असो वा बैलपोळा हे सण शहरातही साजरे होतात.*

*आजही तेल आणि दुध याच्या शुद्धतेवरच आमचेच काय जगाचे निरामय आरोग्य अवलंबून आहे. शेतातील पिकं ( कडबा, धान्ये.. ढेप ) ही जनावरे खातात. बळीराजा शक्य होईल तेवढा शेणखताचा वापर करतोही. पण दिवसागणिक गोवंशाची कमतरता असल्याने ते पुरेसे उपलब्ध नसते.. परवडत नाही. मग या पिकावर जर रासायनिक खते.. औषधाचा वापर होत असेल तर मिळणारे दुध.. तेलबियांचे तेल हे तसेच रासायनिक पदार्थ युक्त आणि पूढे यापासून तयार होणारे सगळे दुग्धजन्य पदार्थ.. मिठाई पण आरोग्याला हानीकारकच. आता मात्र हे चक्र थांबायलाच हवे.*

*भारताचा कणा हा गोधन आहे. देशी गाय भलेही कमी दुध देत असेल किंवा देत नसेलही पण तिचे गोमुत्र.. शेण हे सकस पीक देण्यासाठी.. जमिनीचा पोत सुधारण्यास संजीवक आहे. आज बैलाच्या मदतीने केलेली शेती संपत आहे. याचे कारण आर्थिकदृष्ट्या न परवडणे आणि गोपालकांचा तुटवडा.*

*आता लवकरच सुरू होणाऱ्या नववर्षाचा संकल्प करूया.. निरामय आरोग्याचा, विषाकडून अमृताकडे परतण्याचा.*

*नववर्ष संकल्प..*

*आपण गोवंश वाचवायला अल्पसा प्रयत्न करु या. आजही काही गोरक्षण संस्था कार्यरत आहेत. आपल्या सभोवतालच्या गोरक्षण संस्थांची संपूर्ण माहिती..( तेथे उपलब्ध देशी गोधनाची माहिती गो उत्पादनासह ( जसे दूध, दही, ताक.. लोणी.. तूप.. पेढे.. धूप.. राळ.. गोवरी.. साबण ई. ) यावरचे लेख (शक्य असल्यास व्हिडिओ ) व्हाट्सएप फेसबुक.. इंस्टाग्राम या प्रसारमाध्यमा द्वारे पाठवायचे. घरातील गाय, वासरु.. बैल याबद्दल खूप आठवणी प्रत्येकाकडे आहेत. त्या शब्दांत मांडायच्या.*

*गोरक्षण संस्थेची उत्पादने स्वतः खरेदी करुन इतर नातेवाईक.. मित्रांना पण घेण्यासाठी उद्युक्त करायचे. प्रत्येक घरात गोरक्षणाची सर्वच अशी शुद्ध सात्विक उत्पादने वापरली जावीत हा प्रयत्न करुयात. यामध्ये पंचगव्यासारखी अनेक औषधे पण आहेत. तर नित्योपयोगी राळ.. धूप घरात शुद्ध वातावरण निर्माण करतात. या उत्पादन विक्रीची मदत गोशाळाना मोलाची ठरेल.*

*घरातील प्रत्येक कार्यप्रसंगी, वाढदिवसाला गोरक्षण संस्थेला आर्थिक मदत.. त्यांना आवश्यक असतील त्या भेटवस्तू द्यायच्या. मुख्य म्हणजे कोविडच्या संकटातही स्वतःचा जीव वाचवणेही अवघड होता तेव्हाही त्यांनी स्वतःचे कुटुंब सदस्य म्हणून या गोधनाचा निर्धाराने.. प्रेमाने सांभाळ केलेला आहे. एका माणसाचे पोट भरणे कठीण झाले असतांना या गोपालकांनी सगळे गोधन सुरक्षित ठेवलेय. त्यांना चारा-पाणी पुरवणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे. हे त्यांचे कार्य म्हणजे जगावर केलेले फार मोठे उपकार आहेत.*

*उन.. वारा.. पावसात विपरीत परिस्थितीत गोधनाला जपून समस्त मानव जातीच्या हिताचे कार्य करणाऱ्या गोपालकांचा सन्मान गावोगाव व्हायलाच हवा. आपण गावागावातील.. मोहल्यातील गोधन सांभाळणारी देवस्थाने.. व्यक्ती यांना भेट देवू. त्याची माहिती इतरांना देवू. जाणाऱ्या येणाऱ्यांची पाऊले नक्कीच तिकडे वळतील. आज गो पालन करणाऱ्या गो-पालांचा उत्साह वाढविणे तसेच गौरव करणे गरजेचे आहे.*

*विषमुक्त अन्नापासून सुटका.. गतवैभव प्राप्ती आणि अमृतमय आहाराने पूढील पीढीचे भविष्य सुरक्षित करायला गोवंशवृद्धीच्या अल्पशा मदत मोहिमेत अवश्य सहभागी व्हा. बळीराजा.. गोपाल यांना बळ द्या.*

*जानेवारीत आपले.. कुटुंबातील सदस्यांचे व्हाटसअप DP गाय.. वासरु.. बैल तसेच गोपालन करणाऱ्यांच्या सोबत ठेवा. त्यांचा सन्मान करा.*

*ही तुमची आमची स्वयंस्फूर्त मोहिम आहे यात आपण सहभाग घ्यावा. त्याची माहिती इतरांना कळवत रहावी.*

 

*धन्यवाद* 🙏

 

🌾🐄🌾🐄🌾🐄🌾🐄🌾

संबंधित पोस्ट

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली; भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी

vishwatmaklokswamivarta

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर सादर होणार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta