vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली; भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी

200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली; भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी…

गुजरात प्रतिनिधी

भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या  जहाजांनी बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले.

 

पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे

 

भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATC) संयुक्तपणे कारवाई करत, सुमारे 200 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलोग्रॅम अंमली पदार्थ नेणारी, सहा जण असलेली  एक पाकिस्तानी बोट भारतीय जलहद्दीतून  ताब्यात घेतली. 13-14 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (आयएमबीएल) क्षेत्राच्या जवळच्या भागात गस्त घालण्यासाठी दोन वेगवान आंतररोधी  श्रेणीतील- C-408 आणि C-454– जहाजांना तैनात केले होते. या जहाजांना आयएमबीएलच्या आत पाच नॉटिकल मैल आणि जखाऊपासून 40 नॉटिकल मैल भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या  जहाजांनी बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले.

पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे. किनाऱ्यावरचे सुरक्षा जाळे मजबूत असून त्याच्याशी संबधित यंत्रणांमध्ये असलेल्या प्रभावी समन्वयाचे महत्त्व या कारवाईमुळे अधोरेखित होते.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; महाविकास आघाडीचे ठिय्या आंदोलन..

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद,कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या 57व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक,भक्तीभावनेने ओतप्रोत निष्काम सेवांचे मनमोहक दृश्य दृष्टीगोचर

vishwatmaklokswamivarta

कलिना संकुलातील विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी समिती-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत निवडणूक निकालात बंपर यश, महाराष्ट्रात काय होणार?