vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन..

 

लातूर – प्रतिनिधी :या वर्षात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ या वर्षांमध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजनाला नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सुरुवात झाली. आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्याच्या उपस्थितीत साहित्यिक प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिकमधील लोकहितवादी मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोरोना सावटाखाली पार पडले. संमेलनाची घोषणा झाल्यापासून ते संमेलन पूर्ण होईपर्यंत कोरोनाने काही संमेलनाचा पिच्छा सोडला नाही. आता पुन्हा नव्या ओमायक्रॉनचं सावट आहे. हा विचार करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने २०२२ या वर्षात घेण्यात येणारे ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजनाला आताच सुरू करण्यात आले आहे. या वर्षीचे संमेलन हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे.

संबंधित पोस्ट

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवा – राज्यमंत्री योगेश कदम कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

विरार परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी 3 जणांना अटक

एअर एशिया विमानाचा: विमानाचा टायर चिरला, डीसीजीएकडून एअर एशियाचे विमान पुणे येथे लँड करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

शांतता समितीची सभा; बकरी ईद सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील• गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी• जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे..