vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला , पुतळ्याचे काम पूर्ण,मात्र पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण दिले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. असे स्पष्टीकरण अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले

 

पुणे: प्रतिनिधी  सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवलं होतं, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिलं. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हतं. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असं ते म्हणाले. आता 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी 8 दिवस मिळताहेत चांगलं काम करू. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राणेंकडून अपेक्षा उंचावल्यात

मी सगळ्यांना पुरुन उरलोय, या केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्राचे मंत्री आहेत.राज्य शासनाचे 50 हजार कोटी केंद्राकडे अडकून पडलेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडून फार अपेक्षा उंचावल्या आहेत. मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात, असा टोला भुजबळांनी राणेंना लगावला आहे.

यावेळी भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आवश्यक असलेली सर्व पूर्तता शासनाच्या वतीने केलेली आहे. एका गावाची जनगणना करायची नाही, 12 कोटी जनतेची करायची आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी घरोघरी जाऊन जनगणना करावी अशी इच्छा असेल तर ते लोकांसाठी अन्यायकारक असेल. आरक्षण टिकलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय. अशावेळी लॉकडाउन करावा अशी माझीही इच्छा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
 

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट

देशाच्या पूर्वेकडील राज्ये मेघालय आणि नागालँडमध्ये मतदान सुरू…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व शासकीय इमारतींचेविहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांकडून MSRTC चे आणखी काही कर्मचारी ताब्यात

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा — मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल