vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नागपूर येथील बातमी, निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीत अर्थ नाही कारण…, नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप

नागपूर येथील बातमी, निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीत अर्थ नाही कारण…, नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप

 

नागपूर प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोग कुणाचे ऐकते, कुणाच्या इशाऱ्यावर चालते, हे स्पष्ट झाल्याने महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात, ही मागणी करण्यात अर्थ नाही, अशी नाराजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

नागपूरला आले असता पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील नगरपंचायत आणि भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. ओबीसी आरक्षण व करोना स्थिती लक्षात घेऊन या निवडणुका घेऊ नये, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणूक आयोगाकडे हा निर्णय पाठवल्यानंतरही निवडणुका जाहीर केल्या. यावरून त्यांचे काम कुणाच्या इशाऱ्यावरून चालते हे स्पष्ट होते.

विधानसभा निवडणूक होणाऱ्या सर्व राज्यांत काँग्रेस तयार आहे. शेतकरी, गरीब, छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांपासून जनतेला विचलित करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. सत्तेच्या बाहेर असले की ‘देश को बचाना है’ आणि सत्तेत असले की स्वत:ला वाचवणे, अशी त्यांची घोषणा असते. त्यांची ही भूमिका जनतेने ओळखली आहे. त्यामुळे अनेक राज्यांत काँग्रेसची सत्ता येईल, असा दावाही पटोले यांनी केला

राज्यातील मंत्र्यांविरोधात आमदारांमध्ये नाराजी असल्याचा नाना पटोले यांनी इन्कार केला. आमदार, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटणे चुकीचे नाही, मंत्र्यांबाबत नाराजी असल्याची काही कल्पना नाही व तशी तक्रारही आलेली नाही. राज्यात पक्षाचे सर्व नेते एकजुटीने काम करत असल्याने आमच्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहे, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

3 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण-अवयव प्रत्यारोपण सुविधेसह सर्व सुविधा उपलब्ध करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ००घाटीच्या विकासासाठी एकत्रित निधी देणार- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta