vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायातींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. कार्यक्रमानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, अशा सूचना सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले आहे.

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 28 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल इत्यादी ठिकाणी काम करणारे कामगार व कर्मचारी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल. तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तरी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरीता सर्व प्रकारच्या आस्थापना धारकांनी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली.

vishwatmaklokswamivarta