vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल जाणार १२० रुपयांवर?; मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ

पेट्रोल जाणार १२० रुपयांवर..? मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ…

नागपूर प्रतिनिधी: भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन इंधनदर वाढीवर सरकारचे नियंत्रण आहे. हे सिद्ध होत असले तरी जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केंद्र सरकार कंपन्यांवर आमचे नियंत्रण नसल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांची बोळवण करीत आहे. निवडणुका संपताच पेट्रोल प्रति लिटर १२० रुपयावर जाण्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सौदी अरामकोने मार्च महिन्यासाठी आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे भाव वाढवले आहेत. कंपनीने सर्व कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेही भाववाढ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये १४ राज्यांमधील ३० विधानसभा आणि तीन लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ८३ दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोस्ट

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्यावर हल्लाबोल; मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामावरून गंभीर आरोप

अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीत घट

रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक…

vishwatmaklokswamivarta

63 व्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी; अजित पवार विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी पार्टी