
आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्यावर हल्लाबोल; मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामावरून गंभीर आरोप…
राज्य प्रतिनिधी
आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी मुंबई मध्ये रस्त्यांच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याचे कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. घोषणा करताना सीसीटीव्ही लावले जातील. काम कुठं पर्यंत पोहचलं त्याची माहिती लोकांना कळवली जाईल पण त्याचा देखील पत्ता नसल्याचं ते म्हणाले आहे.
दरम्यान खारघर मधील उष्माघातामुळे झालेल्या जीवहानी वर बोलताना प्रतिक्रिया देताना 25 कोटी खर्चून जर कार्यक्रम केला जातो तर त्यामध्ये सगळ्यांची सोय का पाहिली गेली नाही. यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होतं? त्याच्याकडून कामात काही हलगर्जीपणा झाला का? हे तपासावं असे ते म्हणाले



