vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी; शिंदेसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी; शिंदेसेनेच्या नेत्याचा मोठा दावा…

 

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या  भाजपसोबत  जाण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाठ  यांनी केला आहे. सत्तेची पदं गेल्याने फक्त शिंदे गटातच नाराजी नसून भाजपमध्ये देखील थोडीफार नाराजी आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे अजित पवारांची सत्तेत झालेली एन्ट्री भाजपच्या देखील काही लोकांना पटली नसल्याची आता चर्चा होत आहे.

काही सत्तेची पदं गेल्यावर आमदारांमध्ये नाराजी असते आणि हे साहजिकच आहे. याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. त्यांनी नाराजी दाखवणे हे सत्य आहे. आता हा प्रकार फक्त एकट्या शिवसेनेत (शिंदे गटात) झाला आहे आणि भाजपमध्ये झाला नाही अशातला भाग नाही. भाजपचे देखील 105 आमदार आहेत. काही अपक्ष त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यात देखील काही थोडीफार चालणारच आहे. मात्र या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता करू नका असे सांगितले आहे. तर आपण योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेऊ असे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे.

संबंधित पोस्ट

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

vishwatmaklokswamivarta

आज गुरुनानक जयंती निमित्त विशेष -देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला

vishwatmaklokswamivarta

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना

विश्वविक्रमी दहीहंडी होणार! मनसे दहीहंडी साजरा करण्यावर ठाम.