
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांसोबत भजन, कीर्तन केले आणि करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पूजाही केली. पंतप्रधानांनी प्रथम मंदिरात जाऊन पूजा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांसोबत भजन, कीर्तन केले आणि करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पूजाही केली. पंतप्रधानांनी प्रथम मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिरात बसलेल्या महिलांसोबत भजन, कीर्तन केले. पंतप्रधानांच्या भजन, कीर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान उपस्थितांसोबत संवाद साधतानाही दिसत आहेत.
संत रविदास यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरस भेट दिली. या वेळी त्यांनी तेथे सुरु असलेल्या भजन, कीर्तनात आपला सहभाग नोंदवला. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पंतप्रधान मंदिरामध्ये महिलांसोबत मजीका वाजवत आहे. या दरम्यान ते उपस्थितांशी संवादही साधत आहेत.



