vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शहापूर आणि वसई-विरारमध्ये  बर्ड फ्लूचा धोका कायम, 3 दिवसांत 31 हजार कोंबड्या नष्ट…

शहापूर आणि वसई-विरारमध्ये  बर्ड फ्लूचा धोका कायम, 3 दिवसांत 31 हजार कोंबड्या नष्ट…

 

वसई प्रतिनिधी

बर्डफ्लूमुळे शहापूर आणि वसई-विरारमध्ये तीन दिवसांत ३१ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या.अर्नाळ्यातही शुक्रवार आणि शनिवारी पाच विशेष पथकांनी सर्च ऑपरेशनद्वारे ७ हजार कोंबड्या मारल्या. दोन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या जागेत आणि पुरापाडा इथल्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेत जेसीबीच्या साह्याने खड्डा करून कोंबड्या पुरण्यात आल्या.

 

बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास आणि वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बंदी घातलीय. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे वेधशाळेत पाठवलेले त्यांनी साथीच्या तापाने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

 

अर्नाळ्याच्या दासपाडा परिसरातील बॅरी बरबोज यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत होत असल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने पुणे वेधशाळेत पाठवले. त्यांनी साथीच्या तापाने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी पार्टी चे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक…

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेने भाजपसोबत नव्याने संबंध जोडावेत, आमदार प्रताप सरनाईकांचे वक्तव्य…

गोरेगाव नेस्को येथील कोविंड रुग्णालयाला एक वर्ष पूर्ण अविरत सेवा आजही सुरू…

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला  तुरुंगातून लवकर सुटका का होणार?

पंजाबच्या फिरोजपूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन