vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला; ओखतिर्का शहरात प्रचंड विध्वंस…

 रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला; ओखतिर्का शहरात प्रचंड विध्वंस…

[ विशेष प्रतिनिधी

: रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा दावा युक्रेनच्या नेत्यानं केलाय. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केलाय. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब असं म्हटलं जातं.

व्हॅक्युम बॉम्बनंतर थेट अणुबॉम्बचीच श्रेणी सुरू होते. युद्धात व्हॅक्यूम बॉम्ब वापरण्यास बंदी आहे. तरीदेखील व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा दावा करण्यात आलाय…हा व्हॅक्यूम बॉम्ब इतका भयानक आहे, की तो फुटल्यास 300 मिटर परिसरात प्रचंड हानी होऊ शकते. या बॉम्बमुळे रेडिएशनचा जरी धोका नसला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

रशियानं सुरू केलेली अणुयुद्धाची भाषा थरकाप उडवणारी : संयुक्त राष्ट्र

युक्रेन-रशिया संघर्षावर संयुक्त राष्ट्र आमसभेची आपत्कालीन बैठक सुरू झाली असून संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरेस यांनी युद्ध तातडीनं थांबवून नेत्यांनी चर्चेला सुरूवात केली पाहिजे, असं आवाहन केल आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून, दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. रशियाच्या आक्रमकतेमुळे जगाला धडकी भरली आहे. एवढेच नाही तर रशियाने अणुयुद्धाचीही भाषा केली आहे.

‘रशियानं सुरू केलेली अणुयुद्धाची भाषा थरकाप उडवणारी असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस म्हणालेत.

काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या तातडीच्या आमसभेला परवानगी दिली होती. 11 विरुद्ध एका मतानं हा ठराव मंजूर झाला.

ठरावाच्या बाजुनं 9पेक्षा जास्त मतं पडल्यामुळे रशियाला नकाराधिकार वापरता आला नाही.

आता या आमसभेनंतर संयुक्त राष्ट्रे युद्धखोर रशियाविरोधात कठोर निर्णय घेतात का, याकडे जगाचं लक्ष लागलंय.

संबंधित पोस्ट

परदेशातील शिवमंदिरे

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला, हिंदूंच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार…..

Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दिला राजीनामा, म्हणाले- मी कोणताही त्याग करण्यास तयार

अफगाणिस्तान : दुसरे सर्वात मोठे शहर कंदाहार तालिबानच्या ताब्यात,वृत्तसंस्था एएनआय.

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा युक्रेन दौरा करत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची घेतली भेट!

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेत पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला 

vishwatmaklokswamivarta