
युक्रेनमध्ये भारताचा राष्ट्रध्वज पाकिस्तानी, तुर्कीश विद्यार्थ्यांच्या मदतीला….
बुचारेस्ट (रोमानिया) : भारताचा राष्ट्रध्वजामुळं (Indian Tricolor) युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना शेजारील देशात सुखरुप प्रवेश मिळू शकला इतकंच नव्हे तर पाकिस्तानी आणि तुर्कीश विद्यार्थ्यांनाही (Pakistan-Turkish Students) आपल्या तिरंग्यामुळं युक्रेनमधून (Ukraine War) सुरक्षित बाहेर पडता आलं. म्हणजेच भारतीय विद्यार्थी असल्याचं सांगत या विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे
रोमानियाची राजधानी बुचारेस्ट शहरात दाखल झाल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितलं की, “भारताच्या राष्ट्रध्वजानं युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठी मदत केली. इथकचं नव्हे तर काही पाकिस्तानी आणि तुर्कीश विद्यार्थीही आपल्या तिरंग्यामुळं युक्रेनमधील विविध चेकपोस्ट सुरक्षितरित्या पार करु शकले”
एका मेडिकलच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की, “युक्रेनमध्ये असताना आम्हाला असं सांगण्यात आलं की भारतीयांनी आपल्या हातात आपल्या देशाचा राष्ट्रध्वज ठेवल्यास आम्हाला कुठलीही अडचण नाही. पण आमच्याकडं तिरंगा ध्वज नसल्यानं आम्ही अक्षरशः सुपर मार्केटमध्ये जाऊन स्प्रे पेंट्स आणि कापड विकत घेतलं आणि त्याद्वारे भारताचे राष्ट्रध्वज तयार केले. अशाच प्रकारे काही पाकिस्तानी आणि तुर्कीश विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा वापर करुन स्वतःची सुटका करुन घेतली”



