vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा….

 मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा….

मुंबई प्रति निधी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला.

 

सभागृहात काय म्हणाले फडणवीस

मी पाच वर्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे, देशामध्ये कायद्याने नियमाने काम करणारं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्रचं पोलीस दल आहे, अशी ख्याती महाराष्ट्र पोलिसांची आहे.

 

पण अलिकडच्या काळात या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

आपला विरोधक संपवण्याचं षडयंत्र थेट सरकार करत असेल तर या लोकशाहीमध्ये ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही दिली. तो उद्देश कधीच सफल होऊ शकणार नाही.

 

जी परिस्थिती आज पाहिला मिळतेय, राज्यात काय चाललं आहे. त्यासाठी पेन ड्राईव्ह मी अध्यक्षांना मी सूपुर्त करतो. कशा प्रकाराची कट कारस्थानं सरकारच शिजवतंय, या संदर्भातले सर्व व्हिडिओज या पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं सागत फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला.

संबंधित पोस्ट

जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये भूकंपाचे 3.6 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के…

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता शहंशा अमिताभ बच्चन यांचे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल …

सोलापूर मधील पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन,सर्वाधिक रुग्णसंख्या  गावांमध्ये प्रभावी उपाययोजना केल्या जाणार, मुख्य अधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आता हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणणार, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा…

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

चीनसह पाच देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार RT-PCR..केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया.

vishwatmaklokswamivarta