vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिशा सालियन बदनामी प्रकरणी आज येणार मोठी अपडेट; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष….

 दिशा सालियन बदनामी प्रकरणी आज येणार मोठी अपडेट; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष….

 

मुंबई प्रतिनिधी: दिशा सालियन बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे राणे पिता पुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. दिंडोशी न्यायालयात आज याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे दिशा सालियन बदनामी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे राणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी राणे पिता पुत्र यांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती. त्याप्रकरणी न्यायालय आज फैसला सुनावणार आहे. राणे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली तर, मालवणी पोलिसांच्या वतीने डीसीपी विशाल ठाकूर यांनी बाजू मांडली.

 

महापौरांची राणेंविरोधात तक्रार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला दिला होता. या पत्राची दखल घेत अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नव्हता. त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस सरकारला महाविकास आघाडी सरकारची विधान परिषदेवरील 12 आमदारांची सुची मागे घेण्यास परवानगी

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा

महिला आयोग आपल्या दारीतून तत्‍पर निर्णयाची खात्री-राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर

vishwatmaklokswamivarta