vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ऐकावे ते नवलंच! मंदिरातील देवाला मिळाली कोर्टाची नोटीस; शिवलिंग घेऊन गावकरी पोहोचले न्यायालयात

ऐकावे ते नवलंच! मंदिरातील देवाला मिळाली कोर्टाची नोटीस; शिवलिंग घेऊन गावकरी पोहोचले न्यायालयात…

 

चंदीगड प्रतिनिधी25 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत कोणताही पक्षकार उपस्थित न राहिल्यास त्याला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार होता, त्यामुळे नोटिशीचे पालन करण्यासाठी 25 मार्च रोजी परिसरातील नागरिकांनी हातगाडीवर आदराने शिवमंदिरातील शिवलिंग न्यायालयात हजर केले.

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायगड जिल्ह्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या ठिकाणच्या तहसील कोर्टातून अनोखे प्रकरण समोर आले आहे. तहसील न्यायालयाने शिवमंदिरासह 10 जणांना जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या सर्वांना 25 मार्च रोजी न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते. सुनावणीला हजर न राहिल्यास 10 हजार रुपये दंड आणि जमीन निष्कासनाची कारवाई होऊ शकते, असेही नोटीसमध्ये लिहिले होते. त्यानंतर 25 मार्च रोजी परिसरातील रहिवासी मंदिरातून हातगाडीवर शिवलिंग (Shivling) घेऊन तहसील न्यायालयात पोहोचले.

दृश्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. तहसीलमध्ये अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही आणि पुढची 13 एप्रिल ही तारीख देण्यात आली. रायगड कॉर्पोरेशन अंतर्गत येणाऱ्या कोहकुंडा, वॉर्ड क्रमांक-25 येथे असलेल्या शिव मंदिराबाबत सुधा राजवाडे नावाच्या महिलेने बिलासपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी शिवमंदिरासह 16 जणांवर जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि संबंधित तहसीलदारांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाचे पालन करत तहसीलदारांनी 10 दिवसांपूर्वी शिवमंदिरासह 10 जणांना नोटीस बजावून 25 मार्च रोजी न्यायालयात बाजू मांडण्यास सांगितले होते. तहसील न्यायालयाने बजावलेल्या नोटीसमध्ये सहाव्या क्रमांकावर शिवमंदिराच्या नावाचा उल्लेख आहे. नोटीसमध्ये शिवमंदिराचे पुजारी, व्यवस्थापक किंवा विश्वस्त यांचे नाव न लिहिता थेट शिवमंदिर असे लिहिण्यात आले आहे, अशा स्थितीत ही नोटीस मंदिरातील देवाला बजावली असल्याचा ग्रह करून घेतला.

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

कल्याणच्या_ताल_बार_मध्ये_धिंगाणा #पोलिसासह_सहा_जणांवर_गुन्हा

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ,बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

दूध भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला करार