
महिला वर्ल्ड कप: दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका, टीम इंडियाचे सेसाखळी सामन्यातील आता दोनच सामने शिल्लक आहेत. 27 मार्च, रविवारी दुसऱ्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ एकमेकांशी भिडतील. टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये असून त्यांना टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करणे गरजेचे आहे. टीम इंडिया विजय मिळवून देण्यात खालील खेळाडू महत्वाची भूमिका बजावतील.
(ICC Women’s World Cup) साखळी सामन्यातील आता दोनच सामने शिल्लक आहेत. 27 मार्च, रविवारी पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि बांगलादेश आमनेसामने येतील. तर दुसऱ्या सामन्यात भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women) संघ एकमेकांशी भिडतील. ऑस्ट्रेलिया सर्व लीग सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, तर न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे आफ्रिकी संघाला देखील उपांत्य फेरीतचे तिकीट मिळाले. आता उर्वरित दोन जागांसाठी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारत यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये असून त्यांना टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करणे गरजेचे आहे. हा सामना क्रीस्टचर्च (Christchurch) येथे खेळला जाणार आहे आणि टीम इंडिया (Team India) विजय मिळवून देण्यात खालील खेळाडू महत्वाची भूमिका बजावतील.
भारताची स्टायलिश फलंदाज स्मृती सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत चांगल्या लयीत असून संघासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. स्मृतीने या विश्वचषकात एक शतक ठोकून पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ‘आर या पार’च्या लढाईत स्मृतीकडून मोठी खेळी टीम इंडियाला अपेक्षित असेल. मंधानाने संघाला संघाला प्रभावी सुरुवात करून दिल्यास मधल्या फळीवर दडपण येणार नाही.



