
वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल…
नवी दिल्ली प्रतिनिधीदेशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे.
काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने महागाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. महागाईबाबत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला टोला (Central Govt) लगावला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करताना लिहिले की, ‘राजा करे महल की तैयारी, प्रजा बेचारी महंगाई की मारी’ याआधी शनिवारी राहुल (Rahul Gandhi) यांनी महागाई आणखी वाढेल, असा इशारा दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली होती. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे
यापूर्वी पाच राज्यांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आकडे ट्विट केले आणि जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल केला



