vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील क्रिकेट खेळाडुंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी..

जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील क्रिकेट खेळाडुंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी..

 

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी नूकतीच पार पडली आहे. या चाचणीसाठी जालनासह बुलढाणा, परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनीही सहभाग नोंदवला होता. यावेळी जालना जिल्हा क्रिकेड असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे, राजू काणे, अभिजीत चव्हाण यांची उपस्थिती होती.

ही निवड चाचणी साई काणे अ‍ॅस्ट्रो टर्फ एमआरडीए शाळेजवळ रोहणवाडी रोड येथे घेण्यात आली.

क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया राजू काणे यांनी यावेळी पालकांशी संवाद साधतांना व्यक्त केली. श्री काणे म्हणाल की, जालना क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर खेळून जालनाचे नावलौकीक केलेले आहे. विजय झोल सारख्या खेळाडूने तर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. निवड चाचणीची पद्धत योग्य आहे की कसे याबाबत पालकांच्या काही सूचना असल्यास संघटनेला कळवाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले. यावर खेळाडूंच्या पालकांनी जालना जिल्हा क्रिकेट संघटनेचे आभार व्यक्त करत ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळाडूंची निवड होत आहे ते पाहता राज्यात इतर ठिकाणी अशा पद्धतीने निवड झाल्याचे पाहिले नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. सुरुवातील फास्ट गोलंदाज, स्पीनर गोलंदाज आणि मशिन द्वारे बॉल टाकून फलंदाजांची चाचणी करण्यात येत होती. त्यांना त्यांच्या प्रदर्शनासाठी योग्य अवधी देण्यात येत होता. गोलंदाजांच्या चाचणी करतांना त्यांनाही योग्य अवधी देण्यात आल्याने अनेक पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

जालना, परभणी, बुलढाणा आदी जिल्ह्यातील खेळाडूंनी या निवड चाचणी सहभाग नोंदवला होता यात शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडुंचाही सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात ही निवड चाचणी संपन्न झाली.

या निवड चाचणीसाठी जवळपास 80 वर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यातील जवळपास 30 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून त्यांना पुणे येथे बोनटेस्ट साठी पाठविण्यात येणार आहे. या टेस्ट नंतर जालना जिल्हा क्रिकेट संघात 14 खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याचेही यावेळी राजू काणे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

जालन्याचा महिला क्रिकेट संघ जाहीर कार्तिकी देशमुखची कर्णधारपदी निवड.

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*युवकांचा उत्स्फूर्त प्रसिसाद*उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश जारी

इतर मागास संवर्गातील समूहांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ‘महाज्योती’चा कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ जुलै २०२४च्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी तात्काळ करावी, असे आवाहन

vishwatmaklokswamivarta