
जालन्याचा महिला क्रिकेट संघ जाहीर कार्तिकी देशमुखची कर्णधारपदी निवड.
जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित अंडर 19 महिला क्रिकेट स्पर्धेसाठी जालन्याचा महिला क्रिकेट संघ घोषित करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी कार्तिकी देशमुख हिची निवड करण्यात आली असून संघाच्या प्रशिक्षकपदी मीनल गुरवे यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित संघात मीनल पाटील (विकेट कीपर), जेतेश्री दामले, मानिनी वायाळ, सुकन्या कवाडे, आर्या निशाने, साक्षी सिरसाट, संस्कृती शेवाले, श्रावणी दरगुडे, आरुषी गलांडे, जान्हवी, खंडागळे, हर्षदा भूतेकर, रिया शेख, श्रावणी लिहिनार या खेळाडुंचा सहभाग आहे.
या निवडीबद्दल जालना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष दिलीप शहा, राजू तुकाराम काणे, अभिजीत चव्हाण, रमेश मगरे, अॅड. श्रीकांत देशपांडे, अॅड. सौरभ नाईक, संदीप पाटील, संतोष भारोटे, साई काणे क्रिकेट अकॅडमीचे सर्व खेळाडू, जालना शहरातील सर्व स्तरातील खेळाडू, संघटना यांनी अभिनंदन केले आहे. तसेच जालना महिला संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



