vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

 देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागाने 21 ऑक्टोबरला देशभरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे अकरा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्रात उंच लाटा उभ्या राहण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा फटका मुख्यतः केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांना बसणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान-निकोबार बेटसमूहात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निकोबार बेटांमध्ये सात ते अकरा सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्रात चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, काही ठिकाणी हा वेग पन्नास किमी प्रति तासांहून अधिक होऊ शकतो. 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान समुद्रात पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होतील.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

विधानसभा प्रश्नोत्तर :आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर