vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

नवहिंदूं’चा समाचार घ्यायचाय; उद्धव ठाकरेंचा इशारा

नवहिंदूं’चा समाचार घ्यायचाय; परत सभा घेणार उद्धव ठाकरेंचा इशारा…

मुंबई प्रतिनिधीहिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज्यात सध्या बराच धुरळा उडतो आहे. यामध्ये शिवसेना टार्गेट बनली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच आपण सभा घेणार असून ‘नवहिंदूं’चा समाचार घ्यायचाय, असा थेट इशाराच त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना दिला आहे. बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मला लवकरात लवकर सभा घ्यायची आहे. मग तिथं परत एकदा मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा परत एकदा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नवहिंदू. तेरी कमीज मेरे कमीजसे भगवी कैसे हा त्यांचा पोटशूळ आहे. त्यांचा समाचार मला एकदा घ्यायचाच आहे”

काहीजण आम्हाला म्हणत असतात की आम्ही हिंदुत्व सोडलंय. हिंदुत्व सोडलंय म्हणजे काय केलंय? सोडायला ते काय धोतर आहे का? आमचं हिंदुत्व हे घंटाधारी हिंदुत्व नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्हाला जर हनुमान चालीसा म्हणायचा आहे तर मला फोन करा आणि घरी या. पण जर तु्म्ही दादागिरी करत असाल तर ती कशी मोडायची हे आम्हाला चांगलं ठावूक आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

भाजपा नेते आमदार: नितेश राणेंना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

vishwatmaklokswamivarta

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनाच पसंती, महाराष्ट्र कॉंग्रेसने मंजूर केला ठराव

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मैत्रिपूर्ण लढत, शशि थरुर यांच्या ट्विटला दिग्विजय सिंह यांचा प्रतिसाद.

vishwatmaklokswamivarta

४०० क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

युवकांनो उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ठाकरे गटाचे खासदार: संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा…