vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आयपीएल 15 चा ‘शतकवीर’ जोस बटलरने जिंकली ऑरेंज कॅप, जाणून घ्या त्याने किती धावा केल्या..

आयपीएल 15 चा ‘शतकवीर’ जोस बटलरने जिंकली ऑरेंज कॅप, जाणून घ्या त्याने किती धावा केल्या…

क्रिकेट प्रतिनिधी

IPL 2022 Orange Cap: आयपीएल 2022 व्या हंगामात आतापर्यंत फक्त एक सामना झाला आहे परंतु खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅपची शर्यत आधीच सुरू झाली आहे. जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ऑरेंज कॅपचा मान मिळवला होता.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील मोसमात विक्रमी 863 धावा पूर्ण करत ऑरेंज कॅप जिंकली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ऑरेंज कॅप स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. अंतिम सामन्यात बटलरने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांविरुद्ध थोडा संघर्ष केला परंतु 35 चेंडूंत पाच चौकारांसह 39 धावा करण्यात तो यशस्वी झाला. बटलर आयपीएल 2022 चा स्टार ठरला आणि या वर्षी या स्टार सलामीवीराने चार शतके ठोकली होती. बटलरने सत्राचा शेवट 17 सामन्यांमध्ये 863 धावा करून केला. बटलर आता विराट कोहली (2016 मध्ये 973 धावा) नंतर एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. बटलरपूर्वी वॉर्नरने 17 सामन्यांत (2016 मध्येही) 848 धावा केल्या होत्या

दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर – केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी आयपीएल 15 हंगामात अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, ज्याने राजस्थानविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात 25 धावा केल्या, 468 धावांसह चौथ्या स्थानावर असलेल्या सत्राचा शेवट केला. तसेच पंजाब किंग्सचा चा शिखर धवन टॉप-5 मधून बाहेर पडला.

 

संबंधित पोस्ट

माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचे आयपीएल खेळाडूंवर वादग्रस्त विधान, म्हणाले …

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

महिला आयपीएलसाठी लिलाव होणार ‘या’ दिवशी, 409 खेळाडूंवर होणार ….

vishwatmaklokswamivarta

चेन्नई सुपर किंग्जचा 208 धावांचा डोंगर, Devon Conway ची वादळी खेळी, Dhoni चा ‘फिनिशिंग टच’; दिल्ली गोलंदाजांची उडवली दाणादाण

जागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास सनसनाटी सुरुवात