vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सत्ताधारी गटाला 164 तर, महाविकासआघाडीला केवळ 99 मते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सत्ताधारी गटाला 164 तर, महाविकासआघाडीला केवळ 99 मते..

 

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या नवनिर्वाचीत सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव (Floor Test) मांडण्यात आला. सुरुवातीला हा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. त्यानंतर मतदानाची मागणी करण्यात आली. एकनाथ शिंदे सरकारने हा ठराव 164 मतांनी जिंकला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने मतदान केले.

विश्वावासदर्शक ठरावात सरकारविरोधात विरोधी पक्षांना 99 मते मिळाली. राज्यात पाठीमागील दोन आठवड्यांपासून प्रदीर्घ काळ सुरु असलेली राजकीय उलथापालथ आजच्या विश्वासदर्शक ठरावाने काहीशी संपली.

विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदारांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीवेळी एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, आपल्याला शिवसेनेतील 40 आमदारांचा पाठिंबा आहे.

त्यामुळे आपले सरकार विश्वासदर्शक ठराव 166 मतांनी जिंकेल असा दावा केला होता. प्रत्यक्षात सभागृहात मात्र एकनाथ शिंदे यांना 164 मते मिळाली.

 

संबंधित पोस्ट

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…

बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध दारूविरूद्ध चार कारवाई