vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

शिवसेना आम्हीच, आमचे बंड नव्हे क्रांती आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 शिवसेना आम्हीच, आमचे बंड नव्हे क्रांती आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

शिवसेना  पक्षात आमचे बंड नव्हे तर ती क्रांती आहे. आम्हीच शिवसेना आहोत. लोकशाहीत बहुमताला मोठे मेहत्त्व असते. विधानभा अध्यक्षांनीही विधिमंडळ शिवसेना पक्षास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोणीही वेगळा अर्थ काढू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत आम्ही अद्याप कोणताही विचार केला नाही.

गोष्टी जसजशा पुढे जातील तसतसे आपल्याला समजत राहतील, असेही सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संयुक्त दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप पक्ष्याध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जे शिवसेना आमदार माझ्यासोबत आले आहेत त्यांना पैसे देऊन आणले नाही. ते स्वत:हून आमच्या सोबत आले आहेत. इतक्या सर्वांना पैसे देऊन आणणे शक्यही नसते. ते सर्व स्वमर्जीने आले आहेत. महाविकासआघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर आमदारांची नाराजी होती. कोणत्याही विषयावर आम्हाला बोलता येत नव्हते. मग तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय असो की, हिंदुत्त्वाचा. दररोज आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळविस्तार- एकनाथ शिंदे

बंडखोर आमदारांना 50 खोके मिळाल्याचा ‘अर्थ’पूर्ण आरोप होतो आहे. त्याबाबत विचारले असता कसले खोके? मिठाईचे काय? असा प्रतिसवाल शिंदे यांनी केला. यासोबतच केंद्र सरकार पूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा करणार आहे. त्यानंतर आम्ही (एकनाथ शिदे-देवेंद्र फडणीस) एकत्र बसू आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. आमचे सरकार पुढचीअडीच वर्षे पूर्ण करेल. तसेच, पुढील निवडणुकीत 200 आमदार आम्ही सहज निवडून आणू असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला-कोकण विभागातील निवडणूक तयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतुक मार्गात बदल;पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta