
दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अजय देवगन यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार….
नवी दिल्ली प्रतिनिधी
तमिळ सुपरस्टार सुरिया शिवकुमार आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
बहुप्रतीक्षित 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. तमिळ सुपरस्टार सुरिया शिवकुमार आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सुरियाला सूरराय पोत्रूमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर अजयला तान्हाजी: द अनसंग वॉरियरमधील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.



