vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले !..उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर …मनसेने या मुलाखतीवर ‘कार्टून’ शेअर करत टीका केली आहे.

साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले !..उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर …मनसेने या मुलाखतीवर ‘कार्टून’ शेअर करत टीका केली आहे.

शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊतांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, मनसेने या मुलाखतीवर ‘कार्टून’ शेअर करत टीका केली आहे.

 

संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्टूनमध्ये संजय राऊतांच्या हातामध्ये घड्याळ दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्टूनद्वारे केवळ राऊत ठाकरेसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याच्यावरही निशाणा साधला आहे.

हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं”, असं संजय राऊत म्हणतात. “त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं”, असं उद्धव ठाकरे म्हणतात. असे कार्टूनमध्ये राऊत आणि ठाकरेंमध्ये संवाद दाखवल आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची ३० जूनला शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून त्यांच्यासह त्यांच्यासोबतचे आमदार शरद पवारांमुळे शिवसेनेत उभी फुट पडली असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत.

संदीप देशपांडे यांचे ट्विटर

 

Sandeep Deshpande
@SandeepDadarMNS

Follow

|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले

संबंधित पोस्ट

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली अभिनेता गोंविदा यांची भेट, राजकारण, चित्रपटांवर गप्पा आणि कविताही सादर …

vishwatmaklokswamivarta

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta

एकनाथ शिंदे’ गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे …

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

आषाढीएकादशी निमित्त,वारकरी भक्तांना बसवुनी घरी,   मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दारी” भा.ज.पा. प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्र्यांवर काव्यात्मक टीका केली

vishwatmaklokswamivarta