vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर…

 

व्यावसायिक प्रतिनिधीआठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. आजही सोन्याचे दर स्थिर असून तर चांदीचे दरही मात्र घसरले. (Gold silver update) आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,160 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 549 रुपये आहे. (Gold silver price update 26 july 2022)

 

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 51,490 रुपयेदिल्ली – 51,160 रुपयेहैदराबाद – 51,160 रुपयेकोलकत्ता – 51,160 रुपयेलखनऊ – 51,330 रुपयेमुंबई – 51,160 रुपयेनागपूर – 51,190 रुपयेपूणे – 51,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावीसोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

 

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.हॉलमार्क (Hallmark)-सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

 

संबंधित पोस्ट

सोमवारी जेम पोर्टलविषयी कार्यशाळा

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या हंगामात Ola इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कंपनीने या मॉडेलवर 10 हजार रुपयांची कपात 

तरुणांसाठी खुशखबर : अकासा एअर करणार 1,000 जणांची भरती कर्मचारी कपातीच्या काळात आशेचा किरण…  .

उद्योग सुरु करायचाय? एमआयडीसीत मिळेल जागा*एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूकीसाठीनोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी प्रस्ताव करण्याचे आवाहन