
सोमवारी जेम पोर्टलविषयी कार्यशाळा
जालना, (जिमाका) :- जिल्ह्यात जेम प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते महसूल भवन जालना येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी जेम पोर्टलविषयक कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट-ई-मार्केटप्लेस (जेम) पोर्टलची कार्यपध्दती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जेम पोर्टलचा अधिकाधिक वापर करुन पोर्टलद्वारे वस्तु व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आले आहे. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-



