vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूकीसाठीनोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी प्रस्ताव करण्याचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूकीसाठीनोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी प्रस्ताव करण्याचे आवाहन

 

 

ठाणे द(जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्तालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे शिपाईचे ०१ व शासकीय तांत्रिक विद्यालय, मुरबाड येथे सफाईगारचे एकूण ०१ पद सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूक करावयाची आहे. त्यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांकडून दि.१९ जुलै २०२४ रोजीपर्यंत या कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

 

प्रस्ताव सादर करताना शासन निर्णय क्र.इएसई-२००३/प्र.क्र.१९१/रोस्वरो-१, दि.१फेब्रुवारी२००६च्या मार्गदर्शनानुसार अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी चालू वित्तीय वर्षातील लेखा परीक्षण (सन २०२२-२३) सादर करावे. अपूर्ण किंवा अटींची पूर्तता न करणाऱ्या सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, काम देणाऱ्या आस्थापनांची व त्यांच्या कामाची माहिती त्यांच्या सेवा व शर्ती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, असेही श्रीमती साळुंखे यांनी कळविले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाहन

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण- उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..