vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण- उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण- उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

गोंदिया प्रतिनिधी

आमगाव-देवरी भाजपा उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ देवरी, गोंदिया येथे आयोजित भाजपा जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी विराट जाही जनसमुदायाला संबोधित केले की,काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे. मविआच्या लबाड सरकारने धानाला बोनस जाहीर केले मात्र जाहीर केलेले बोनस कधीच दिले नाही. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या सरकारने ₹15 हजार बोनस दिले, त्यापुढील वर्षी ₹20 हजार बोनस म्हणून दिले. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर धानासाठी ₹25 हजार बोनस देणार आहोत, तसेच शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत.

पुन्हा एकदा आमगाव-देवरी मतदारसंघामध्ये संजय पुराम यांच्याकरता आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो तेव्हा या भागाचा सातत्याने विकास आपल्या सरकारने केला. आमदार नसतानाही संजय पुराम यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक कामे आपल्या सरकारकडून मंजूर करुन घेतली.

काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे. मविआच्या लबाड सरकारने धानाला बोनस जाहीर केले मात्र जाहीर केलेले बोनस कधीच दिले नाही. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या सरकारने ₹15 हजार बोनस दिले, त्यापुढील वर्षी ₹20 हजार बोनस म्हणून दिले. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर धानासाठी ₹25 हजार बोनस देणार आहोत, तसेच शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. यावेळी केंद्रातील मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने व महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचा सविस्तरपणे आढावा घेतला आहे

दरम्यान आदिवासी समाजाकरिता भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपल्या सरकारने हाती घेतली. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा, वस्त्यांचा समग्र विकास होत आहे. महायुती सरकारने महिला, युवा वर्ग आणि विविध समाज घटकांच्या कल्याणाकरिता आणलेल्या योजनांची माहितीही याप्रसंगी दिली.

यावेळी मध्य प्रदेशचे माजी मंत्री नरोत्तम मिश्राजी, आ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट

सुधागड पंचायत समितीला आय.एस.ओ. मानांकन 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी-तीन स्थिर सर्वेक्षण पथकांची नेमणूक

vishwatmaklokswamivarta

कलकत्ता येथील डॉक्टर चे सामुहिक बलात्कारानंतर हत्या या कोलकाता प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा…

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

मतदान यंत्रांची 7 विधानसभा संघनिहाय प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण   — जिल्हाधिकारी किशन जावळे