vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

 मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत..

 

मुंबई प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबींसीसह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सोडत काढली जाणार आहे. आधीच्या सोडतीतील सर्वसाधारण महिला सोडत रद्द केली जाणार आहे. आता उद्या ओबीसी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण पुरुष आणि सर्मवसाधारण महिला यांच्यासाठी पुन्हा सोडत काढली जाणार आहे.

 

यामुळे आता इच्छुकांमध्ये धाकधूक, चिंता आणि उत्सुकता असं काहीसं वातावरण निर्माण झालं आहे. 31 मे रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये अनेक दिग्गजांना आपले वॉर्ड गमवावे लागले होते. आता पुन्हा एकदा सोडत होणार असल्याने काही जणांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

 

मुंबई महापालिकेत 9 वॉर्डस वाढले आहेत. यामुळे यावेळी मुंबई महापालिकेत 63 जागांवर ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. यंदाच्या सोडतीतही गेल्या तीन निवडणुकीतील पुरुष ओबीसी आरक्षण जाहीर झालेल्या प्रभागात महिला आरक्षण जाहीर करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे.

 

आरक्षण सोडतीचे वेळापत्रक

आज सकाळी ११.०० वा.

 

ठिकाण – बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, ऑडीटोरियम हॉल, रोड क्र. २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल कॉलेजच्यासमोर, बांद्रा (प.), मुंबई

 

दरम्यान अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती आणि अुसूचित जमाती महिला यांच्या सोडतीमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने आणि यांच्यासाठी जागा राखून ठेवल्यामुळे त्यांच्या आरक्षणात कोणाताही बदल होणार नाही. त्यामुळे त्यांचे आरक्षण हे ३१ मे २०२२ रोजी काढलेल्या सोडतीनुसारच कायम राहणार आहे.

 

मुंबई महापालिका लोकसंख्या, जागा आणि प्रभाग

 

एकूण लोकसंख्या – १ कोटी २४ लाख ४२, ३७३

 

एस. सी. – ८ लाख ३ हजार २३६

 

एस. टी. – १ लाख २९ हजार ६५३

 

————————————————————–

 

एकूण जागा – २३६

 

महिला आरक्षित – ११८

 

—————————————————

 

एकूण जनरल जागा – १५६

 

जनरल महिला जागा – ७७

 

——————————————————-

 

एकूण ओबीसी जागा – ६३

 

ओबीसी महिला जागा – ३२

 

एकूण एस. सी. जागा – १५

 

एस. सी. महिला जागा – ८

 

———————————————-

 

एकूण एस. टी. जागा – २

 

एस. टी. महिला जागा – १

संबंधित पोस्ट

नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी

पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ• जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट…

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी,घरे वेग वाढवणार-म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  सोडत

बॅन्डस्मन पोलिस शिपाई भरतीसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा

हिंद दी चादर’ समूहगानाचा नवा जागतिक विक्रम; 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा इतिहास