vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बीड जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर, पाहा कोणते गट ओबीसी, एसी, एसटी राखीव

बीड जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर, पाहा कोणते गट ओबीसी, एसी, एसटी राखीव…

 

महाराष्ट्र प्रतिनिधीराज्यात ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) चर्चा सुरु असतानाच तिकडे बिड जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण (Beed ZP Reservation) काढण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेत एकूण 69 गट आहेत

राज्यात ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) चर्चा सुरु असतानाच तिकडे बिड जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण (Beed ZP Reservation) काढण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेत एकूण 69 गट आहेत. या गटासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात ओबीसी, एसी, एसटीसह (OBC, SC, ST Reservation) महिला आरक्षणाचाही समावेश आहे. नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण हे बिडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आले. तर, पंचायत सिमितीसाठीचे आरक्षण तहसीलदार कार्यालयातून काढण्यात आले.खुला प्रवर्ग पुरुष- 20सर्वसाधारण महिला- 21

ओबीसी- 18

अनुसूचित जाती-9

अनुसूचित जमाती-1

गटांसाठी जाहीर झालेले आरक्षण आरक्षण

अनुसूचित जातीसाठी आरक्षित गट- मापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर

अनुसूचित जाती महिला आरक्षित गट- उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गट – जिरेवाडी

ओबीसी आरक्षित गट- रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया

ओबीसी आरक्षित महिला गट- रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित गट- ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. त्यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण काढण्यात आलं आहे. आरक्षणामुळे काही इच्छुकांना आनंद झाला आहे. तर, काहींची मात्र चांगलीच गैरसोय झाली आहे.

 

 

संबंधित पोस्ट

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा,महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे  – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या १०११ तक्रारी प्राप्त; यापैकी ९९५ निकाली…

vishwatmaklokswamivarta

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न