
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 150 तरुणाची पुणे-मुंबई बाईक रॅली, देणार हेल्मेट जागरुकतेचा संदेश…
मुंबई प्रतिनिधी
पुणे ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई या मार्गावर पुण्यातील 150 तरुण बाईकर्स बाईक रॅली काढणार आहेत.
हेल्मेट सक्तीबाबत कायम नकारात्मक घंटा वाजवणाऱ्या पुणेकरांचा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी हेल्मेट वापराच्या जागरुकतेबाबत विशेष संदेश देणार आहेत. पुणे (Pune) ते गेट वे ऑफ इंडिया , मुंबई (Mumbai) या मार्गावर पुण्यातील 150 तरुण बाईकर्स बाईक रॅली काढणार आहेत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तरी हे सगळे बाईकर्स हेल्मेट घालून हा पुणे ते मुंबई प्रवास करणार आहेत. बाईक रॅलीतून हेल्मेटबाबत जागृता निर्माण करण्याचा या बाईकर्स (Bikers) हेतू आहे.



