vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

मुकेश अंबानी यांनी सलग दुसर्‍या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज मधून वेतन न घेणं केलं पसंत!

मुकेश अंबानी यांनी सलग दुसर्‍या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज मधून वेतन न घेणं केलं पसंत…..

मुंबई प्रतिनिधी

रिलायन्स इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कोरोना संकटाचा व्यवसायाला बसणारा फटका पाहता सलग दुसर्‍या वर्षी पगार नाकारला आहे.

कोट्याधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी Reliance Industries मधून आपलं वेतन घेतलेले नाही. कोरोना संकट काळामध्ये व्यवसायाला बसलेल्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःहून वेतन घेणं टाळलं आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालामध्ये मुकेश अंबानी यांचा 2020-21 मधील वेतन ‘शून्य’ दाखवण्यात आले आहे. जून 2020 मध्ये Reliance Industries चे एमडी आणि चेअरमन मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने पगार नाकारला होता. 2021-22 साठी देखील त्यांनी आपला हा निर्णय कायम ठेवला आहे.

 

मुकेश अंबानींनी त्यांच्या पदासाठी असलेले कोणतेही भत्ते, कमिशन, स्टॉक ऑप्शन्स घेणं टाळलं आहे. तत्पूर्वी त्यांचे वेतन अंदाजे 15 कोटी पर्यंतच त्यांनी सीमित केले होते. त्याचे चुलत भाऊ निखिल आणि हेतल मेसवानी यांचे मानधन 24 कोटी रुपयांवर कायम राहिले, परंतु यावेळी 17.28 कोटी रुपयांचे कमिशन समाविष्ट आहे. कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या मानधनात किरकोळ घट झाली आहे.

 

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता या कंपनीच्या संचालक मंडळातील बिगर कार्यकारी संचालक पदी आहेत. नीता अंबानींनी वर्षभरासाठी पाच लाख रुपये सिटिंग फी आणि आणखी 2 कोटी रुपये कमिशन घेतले आहे. मागील वर्षी नीता अंबानींना 8 लाख रुपये सिटिंग फी आणि 1.65 कोटी रुपये कमिशन मिळाले होते. अंबानी व्यतिरिक्त, RIL बोर्डात मेसवानी बंधू, प्रसाद आणि कपिल हे पूर्णवेळ संचालक आहेत.

साभार लेटेस्ट बातमी

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजित पवारांचं मोठं विधान

वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका- शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

विशेष लेखः-‘आला पावसाळा; आरोग्य सांभाळा’

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा

vishwatmaklokswamivarta

आयआयटी दिल्ली  जामिया मिलिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल  म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक ..