vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातानंतर विनायक मेटे यांना मदतीसाठी तास गेला आणि होत्याचं नव्हतं झालं; सहकार्‍याची माहिती

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातानंतर विनायक मेटे यांना मदतीसाठी तास गेला आणि होत्याचं नव्हतं झालं; सहकार्‍याची माहिती….

पनवेल प्रतिनिधी

विनायक मेटे यांचे ड्रायव्हर आणि सहकार्‍याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीड (Beed) कडून मुंबई-पुणे एक्सप्रेस (Mumbai Pune Expressway) वरून येत असताना आज सकाळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा जबर अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान मेटे यांच्यासोबत प्रवास करत असणार्‍या एकनाथ कदम यांनी मीडीयाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यासाठी एका तासाचा काळ गेला. त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही आणि यामध्येच त्यांना प्राण गमवावे लागले

 

एकनाथ कदम यांनी अपघाताची माहिती देताना पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. ट्रकने कट मारल्याने त्याच्या बंपरमध्ये गाडी अडकून ती काही मीटर खेचून पुढे गेली. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एकनाथ कदम यांच्या माहितीनुसार, अपघातानंतर ते मेटेंशी बोलत होते त्यांना प्रतिसाद मिळत होता. मदतीसाठी ते 100 नंबर वर संपर्क करत होते पण फोन उचलला गेला नाही. रस्त्यावरील गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण वेळेत मदतीला कोणती गाडी थांबली नाही. अशामध्ये त्यांना हॉस्पिटला नेण्यात उशिर झाला.

मेटे हे मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये येत होते. त्यांच्या ड्रायव्हर आणि सहकार्‍याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साबा र मुंबई लेटेस्ट बातम्या मध्ये हि बातमी आलेली आहे

संबंधित पोस्ट

येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळणार, वादळाची शक्यता

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण वमहिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

राजधानी दिल्लीत भीषण अग्नितांडव, 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी..

मालाड मालवणी मधील इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

वनविभागाचे सौंदर्यीकरण,सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर– वनमंत्री गणेश नाईक