vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र पर्यटनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सव मंडळ यात्रा; जाणून घ्या दर, तारखा व मंडळांची नावे

महाराष्ट्र पर्यटनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सव मंडळ यात्रा; जाणून घ्या दर, तारखा व मंडळांची नावे …

मुंबई प्रतिनिधी

उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटनाने प्रथमच 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेश पंडाल हॉपिंग टूर (Pandal-Hopping Tours) म्हणजेच गणपती दर्शन यात्रा सुरू केली आहे.

 

दरवर्षी मुंबई (Mumbai) आणि संपूर्ण महाराष्ट्रात वार्षिक 11 दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये खास सजावट, थीम आणि संदेश असलेल्या लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये लोक गर्दी करतात. पुणे, मुंबई अशा ठिकाणी तर लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाचे दर्शन घेतात. आता या उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटनाने प्रथमच 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेश पंडाल हॉपिंग टूर (Pandal-Hopping Tours) म्हणजेच गणपती दर्शन यात्रा सुरू केली आहे.

 

या दौऱ्यात गणपती मंडळांच्या दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे अशी शहरे निवडू शकतात. मुंबईतील महाराष्ट्र पर्यटन GSB वडाळा, गणेश गली लालबाग, विलेपार्ले पेशवे गणपती, खेतवाडीचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिर यासारख्या लोकप्रिय गणेश मंडळांचा समावेश असेल.

पुण्यात, कसबा गणपती, दगडूशेठ आणि तुळशीबाग गणपती यासह इतर मंडळे समाविष्ट केले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पेशल टूरचा लाभ घेण्यासाठी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याने, 75 रुपये दर आकारला जाईल. इच्छुक व्यक्ती महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र पर्यटन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या यात्रेसाठी 1,2,5,6 आणि 7 सप्टेंबर रोजी 25-30 आसनी वातानुकूलित बस उपलब्ध करून दिली जाईल.

 

मुंबईत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान हा दौरा असेल. पुण्यात सहलीची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 दरम्यान असेल, तर नागपूर आणि ठाण्यात 9 ते 5 वाजेपर्यंतची वेळ असेल. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या सहलीत रस दाखवला आहे. इच्छुक अर्जदारांना लसीकरण प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर वैध तपशील प्रदान करावे लागतील. या बसमध्ये एक टूर गाईड असेल आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरही संपर्कात असतील.

विशेष आभार मुंबई लेटेस्ट बातम्या मधील ही बातमी

संबंधित पोस्ट

खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोन भू-प्रणाम केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्‌घाटन…

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

भारतीय वायुसेनेत अग्नीवीरांच्या रजिस्ट्रेशन साठी आजपासून सुरूवात; indianairforce.nic.in वर करा अर्ज

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरीसांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय