
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट…
मुंबई प्रतिनिधीया
गणेशोत्सवानिमित्ताने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे साहेब यांनी भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. या भेटीमुळे नव्या अटकळांना तोंड फुटले आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणरायाचे दर्शन घेतले बाकी काहीच चर्चा झाली नाही. जूनमध्येही शिंदे यांनी राज ठाकरेंशी संवाद साधला होता. या संभाषणानंतर दोन्ही पक्ष आगामी नागरी संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा झाली होती.
गुरुवारी, गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया येथेही गणपती दर्शनासाठी पोहोचले होते.



