
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आले आहेत राज्यपालांची घेतली भेट
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते तरी मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते काही विशेष भेटीगाठी घेणार आहे. आज सकाळीच महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. तसेच अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही (CM Eknath Shinde) भेट घेणार असल्याची चर्चा आहे. अजित डोवाल पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish Sheth) तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेटणार आहेत. गणेशोत्सवा (Ganeshotsav) दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते तरी मुंबईसह महाराष्ट्राच्या (Maharashtra) सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. तरी या दौऱ्यामागचं नेमक कारण काय हे अद्यापही पुढे आलेलं नाही.




