vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

स्थलांतरित रोहिंग्या हे बांगलादेशवरचे ओझे; त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो – पंतप्रधान शेख हसीना

स्थलांतरित रोहिंग्या हे बांगलादेशवरचे ओझे; त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो – पंतप्रधान शेख हसीना.

विदेश प्रतिनिधी

दहा लाखांहून अधिक रोहिंग्या स्थलांतरितांचा बांगलादेशवर मोठा भार आहे. भारत या मुद्द्यावर मोठी भूमिका बजावू शकतो आणि ते त्यांच्या मायदेशी परत जावेत यासाठी देश आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा करू शकतो, असं बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं आहे.

 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी रोहिंग्या (Rohingya) स्थलांतरितांचे वर्णन बांगलादेशसाठी मोठे ओझे असल्याचे केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, दहा लाखांहून अधिक रोहिंग्या स्थलांतरितांचा बांगलादेशवर मोठा भार आहे. भारत या मुद्द्यावर मोठी भूमिका बजावू शकतो आणि ते त्यांच्या मायदेशी परत जावेत यासाठी देश आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा करू शकतो. मला वाटते की भारत ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. बांगलादेशातील लाखो रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या राजवटीला आव्हाने निर्माण झाली असल्याची कबुली हसीनाने एएनआयशी बोलताना दिली

 

शेख हसीना पुढे बोलताना म्हणाल्या की, हे आमच्यासाठी मोठे ओझे आहे. आपल्या देशात 11 लाख रोहिंग्या आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आमच्या शेजारी देशांशी देखील सल्लामसलत करत आहोत. त्यांनीही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून ते मायदेशी परत जातील.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय देतो आणि सर्व काही पुरवतो. कोविड काळात आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचे लसीकरण केले. पण ते इथे किती दिवस राहणार? त्यामुळे ते छावणीतच आहेत. काही लोक अमली पदार्थांची तस्करी, महिलांची तस्करी करतात आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ते जितक्या लवकर मायदेशी परततील, ते आपल्या देशासाठी आणि म्यानमारसाठीही चांगले आहे.

 

संबंधित पोस्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी बांगलादेशातील BNP सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार.

vishwatmaklokswamivarta

यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प यांची जोरदार तयारी

पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

vishwatmaklokswamivarta

नॉर्थ कोरिया चे प्रमुख किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट

EVM हद्दपार! आता बॅलेट पेपरवर होणार मतदान; लोकसभा निवडणुकांसाठी सरकारची मोठी घोषणा….

चायना मध्ये म्यानमार  चे राजदूत यांचा चा मृत्यू; मागील वर्षभरात चौथ्या राजदूताचा अचानक मृत्यू…

vishwatmaklokswamivarta