vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

औरंगाबाद येथे नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चौघांवर गुन्हा

औरंगाबाद येथे नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चौघांवर गुन्हा…

 

औरंगाबाद प्रतिनिधी

कापड दुकान टाकण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्याची मागणी करीत मानासिक व शारिरिक छळ करुन वडगाव (को.) येथील १८ वर्षीय नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले. या प्रकरणी पती, सासू, सासरा,नंणद या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

आरतीचे २०२२ मध्ये वडगाव (को.) येथील योगेश कारभारी गाडेकर याच्यासोबत लग्न झाले होते. काही दिवस आरतीला सासरकडील मंडळीनी चांगली वागणुक दिली. मात्र त्यानंतर किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण करत असे. त्यामुळे आरतीच्या आई वडीलांनी पती योगेश याची समजूत काढली होती. त्यांनतर काही दिवस चांगली वागणूक दिली मात्र पुन्हा लग्नात हुंडा दिला नाही. कापड दुकान टाकायचे असून माहेरावरून दोन लाख रुपये घेवून ये, असे म्हणून पती योगेश, सासू, सासरे, नंणद यांनी आरतीला दरारोज शिवीगाळ करीत मारहाण करीत होते.

 

त्यांनतर आरतीची मोठी बहीण व तीचे पती यांनीही सामजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना घरातून हकलून दिले. शुक्रवारी (ता.९) योगेशने आरतीला माहेरी जिकठाण येथे आणू सोडले व मला दुकान कपड्याची दुकान टाकण्यासाठी २ लाख रुपये द्या, तरच मी हिला नांदविण्यास घेवून जाईल. असे म्हणत योगेश निघुन गेला. त्यांनतर आरतीच्या वडीलांनी योगेश यास फोन करून पैसे देतो. असे सांगून समजूत काढली. त्यांनतर मंगळवारी (ता.१३) रोजी योगेश हा सासरी येवून आरतीला त्रास देणार नाही. मला माफ करा. असे म्हणून तीला घेवून गेला.मात्र त्यांनतर योगेश, सासु, सासरे, नंणद यांनी तीला त्रास दिला. त्यामुळे आरतीने रागच्या भरात राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अ‍ॅगला ओढणीच्या सह्याने गळफास घेतला. तिच्या या आत्महत्येस सासरकडील मंडळींना जबाबदार धरून कारभारी गाडेकर यांनी फिर्यादी दिल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरतीचा पती योगेश गाडेकर, सासरा कारभारी गाडेकर, सासु लक्ष्मीबाई गाडेकर, नणंद ज्योती लाड. या चौघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पुढील तपास सपोनि गोतम वावळे करीत आहे.

अशी ही बातमी सकाळ वर्तमानपत्रातही आलेली आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील वाशिममध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका, दोघांना अटक…

अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, वापर अथवा साठवणूक केल्याचे आढळल्यास पोलीस विभागाला माहिती द्यावी

देशातील बहुचर्चित हत्याकांड : श्रद्धा वालकर हत्या: आरोपी आफताब अमीन पूनावाला वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश; आफताब कडून खटल्याचा दावा…

नालासोपारा संतोषभुवन येथे फायरिंग करणारा इसम मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

कल्याणमध्ये  तिसगाव परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीची निघ्रृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना पोलिसांची माहिती

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.