vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिम्मत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिकेची व महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा’; उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना आव्हान

हिम्मत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिकेची व महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा’; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना आव्हान.

मुंबई प्रतिनिधी गोरे गाव येथील नेस्को सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृहामध्ये सर्व बंडखोर आमदारांसह केंद्र सरकारवर पण जोरदार टीका केली

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, अमित शाह, बंडखोर आमदार यांच्यावर कडाडून टीका केली.

 

यंदाच्या शिवसेनेच्या शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अद्याप पक्षाला शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशात आज शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या मुद्दांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, अमित शाह, बंडखोर आमदार यांच्यावर कडाडून टीका केली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलले.

‘आज पर्यंत मी पोरे पळवणारी टोळी ऐकली होती. मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बाप पळवणारी टोळी पाहत आहे. ज्यांना मी सत्तेचे दूध पाजले तेच आज उलट्या करायला लागले आहेत,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

‘२५ वर्षे आमची युतीत सडली. नालायक माणसं आम्ही जोपासली. वरती पोहचल्यावर लाथा मारायला लागलात. तुमचा वंश कोणता ? बाहेरचे उपरे किती घेतले तुम्ही. बावनकुळे की एकशे बावनकुळे. चित्ता करतो म्याव..चित्ता डरकाळी नाही फोडत. वरळी डेअरीच्या जागी जागतिक मत्स्यालय झाले पाहिजे. धारावीत आर्थिक केंद्र झाले पाहिजे.’ असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.

वेदांतावरुन आव्हान

वेदांतावरून धादांत खोटे बोलले जात आहे. वेदांता आणा,आम्ही तुमच्यासोबत येतो. मिंधे फक्त होय महाराजा म्हणत आहेत. दिल्लीत मुजरा घालायले गेलेत. संकटात धावून जाणारा शिवसैनिक असतो

 

संबंधित पोस्ट

कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघातात  तिघे जण जागीच ठार तर 18 जण जखमी, खासदार.सुप्रिया सुळे यांनी  झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन.ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन…

मुंबईत बीकेसी येथे महाविकास आघाडीची जाहीर सभाअसल्याने पर्यायी मार्गाचे वापर करण्याच्या सूचना-मुंबई वाहतूक पोलिसां ची माहिती

vishwatmaklokswamivarta

2022 दिवाळीच भारतीय सैनिकांसह साजरी करण्यासाठी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी कारगिल मध्ये दाखल..

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू