बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू
बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू
राज्य प्रतिनिधी-बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेले लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बुधवारी (2 एप्रिल) सादर करणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी एनडीए सरकारची भूमिका स्पष्ट केली.
२ एप्रिल रोजी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर केलं जाणार आहे. विधेयकावर ८ तास चर्चा केली जाईल. हा अवधी वाढविला जाईल, असे संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितलं.केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, जर सभागृहाला वाटत असेल तर वेळ वाढवता येईल. परंतु, जर विरोधी पक्ष काही सबबी सांगून चर्चेत भाग घेऊ इच्छित नसतील तर आम्ही ते थांबवू शकणार आहे. आम्हाला चर्चा हवी असून प्रत्येक राजकीय पक्षाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. दुरुस्ती विधेयकावर कोणत्या राजकीय पक्षाची भूमिका काय आहे, हे देशाला जाणून घ्यायचं आहे. दुरुस्ती विधेयकाला कोणी विरोध केला? कोणी पाठिंबा दिला, हे रेकॉर्डवर राहील. आम्ही ८ तासांच्या चर्चेसाठी सहमती दर्शविली आहे अशी ही ए एन आय वरही बातमी आली आहे