
देशात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई गुन्हे शाखेकडून अटक…
मुंबई प्रतिनिधी
भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देईल, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील देशात बॉम्बस्फोट करण्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 506 (2) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तरी फोन कॉल द्वारे ही धमकी देण्यात आली होती. संबंधित कॉलरचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती गुन्हे शाखा तपास करत होती. तरी काल संध्याकाळी या अज्ञान कॉल करणाऱ्याच्या मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आलं.
.
अटक केलेल्या या आरोपीच नावं रणजितकुमार सहानी असं असून तो बिहारमधील (Bihar) रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातून या अज्ञात इसमास अटक करण्यात आली. तरी या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा सखोल तपास करीत आहे. या प्रकरणात हा एकटाच सहभागी आहे की याचे काही साथिदार आहेत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
रणजीत कुमारने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. गुन्हे शाखेने तपास केल्याप्रमाणे सहानीने हैद्राबादमधून कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सहानी मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेने सुरू केले. तरी मुंबईसह देशात घातपात घडवून आणणार असल्याच्या बातम्या हल्ली रोज कानवर पडत आहेत. तरी प्रशासनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे



