vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

देव आणि दैत्य”मानव जाती च्या सुरवाती पासूनच देव आणि दैत्य ही दोन विरोधी मतं याठिकाणी होती.

“देव आणि दैत्य”मानव जाती च्या सुरवाती पासूनच देव आणि दैत्य ही दोन विरोधी मतं याठिकाणी होती.

 

दैत्य किंवा असूरांच्या मते या सृष्टित जे काही आहे ते सगळं आपल्या साठीच आहे, मिळालं तर ठिक नाही मिळालं तर ओरबाडून घ्या …(माता सितेचं अपहरण याच दैत्य संस्कृती ची मानसिकता दर्शवते) थोडक्यात काय खा प्या मजा करा असं एकंदरीत त्यांची विचारसारणी होती…याऊलट सनातन विचारसरणी ही सहअस्तित्वाची भावना ठेवत आलीये, पशु- पक्षी ,झाडं यामधे देखील ते स्वतः चं रुप बघत होते आणि यांना देखील जगण्याचा अधिकार आहे असं मानून त्यांचा सन्मान करत होते.

 

दैत्य संस्कृती ने कधीच कुठलं मत किंवा नवीन विचार पुढे येऊ दिले नाही, ते कायमच आक्रमक स्वभावाचे राहीले आहेत, ज्यांनी स्वतः व्यतिरिक्त कधीच कुठल्या मताचा आदर केला नाही…या उलट सनातन संस्कृतीत पुढे जैन, शीख , बौध्द, आर्य समाज असे वेगवेगळी मतं येत गेली पण सनातन संस्कृती ने त्यांना खाऊन न टाकता त्यांना पुष्पित-पल्लवित होऊ दिलं आणि सरतेशेवटी आपल्यातच सामावून घेतलं,

 

वरील दोन्ही (देव आणि दैत्य) मतांमधे कायमच संघर्ष राहीला आहे आणि आपल्या येथील ऋषी मुनींनी भगवान श्रीराम यांना या संघर्षाचा नायक बनवलंय…याउलट रावण दैत्य संस्कृती चं प्रतिनिधीत्व करतो.

 

रावण दहनाला आपण असत्यावर सत्याचा विजय, दैवी शक्ती चा असूरी शक्तींवर विजय याचंच प्रतीक मानतो.

 

वाईट विचार जळू दे आणि चांगले विचार मागे शिल्लक राहु दे अशीच आपली भावना त्यामागे असते…

 

आणि म्हणूणच रावण दहन आपण एक उत्सव म्हणूण साजरा करतो,

 

या विजया दशमीला देखील आपण वाईट विचारांचा नाश करुयात (रावण जाळून) कारण रावण एकदा जळाला की मागे उरतो तो #राम #राम आणि फक्त #राम

 

जय श्रीराम 😊

 

#मन_से_रावण_जो_निकाले_राम_उसके_मन_मे_

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्यांची सत्ता स्थापन करून एक आदर्श राजाबरोबरच एक आदर्श समाज घडविला-l- ह.भ.प. शितलताई साबळे-पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

ल परमात्म्याचे वरदानत्याचे अमृताप्रमाणे रक्षण करा- सद्गुरु सुदीक्षा महाराज…

vishwatmaklokswamivarta

आज चे पंचांग सप्टेंबर २४- -०९-२०२१ (शुक्रवार)* 

vishwatmaklokswamivarta

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते….

आषाढी  एकादशीच्या मुहूर्तावर,विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🪷🙏🏻*

श्रीरामोपासना !◆! 🙏🏻🙏🏻रामरक्षा हे स्तोत्र आणि “श्रीराम जयराम जयजय राम”. ह्या मंत्राशिवाय रामोपासना पूर्ण होऊ शकत नाही. ही एक अतिशय प्रभावी साधना आहे.