vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तुम्ही देशातील तरुणांची मानसिकता दुषित करीत आहात, सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपूरला फटकारलं

तुम्ही देशातील तरुणांची मानसिकता दुषित करीत आहात, सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपूरला फटकारलं..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

तुम्ही लोकांना मनोरंजनासाठी कशा प्रकारचे पर्याय देत आहात? याशिवाय तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात, असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपुरला झापलं आहे.

 

निर्माती एकता कपुरची (Ekta Kapoor) आणखी एक वेब सिरिझ (Web Series) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी तर थेट सर्वोच्च न्यायालयानेचं (Supreme Court) एकता यांना खडे बोल सुणावले आहेत. कारण ठरली ते अल्ट बालाजी (Alt Balaji) या ओटीटी प्लाटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झालेली वेबसिरिज (Web Series) ट्रीपल एक्स (XXX). या वेबसिरिजमध्ये भारतीय सैनिकांचा (Indian Army) अपमान करणारी काही दृश्य दाखवण्यात आली आहे ज्याबाबत एकता कपुर विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पुर्वीही याचं पध्दतीच्या प्रकरणात एकता विरोधात या प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती. पण यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकता कपुर यांची चांगलील कानउघडणी केली आहे. ‘तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात’ असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला झापलं आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटलं आहे की, लोकांना हे तुम्ही मनोरंजनासाठी (Entertainment) कशा प्रकारचे पर्याय देत आहात.  प्रत्येक वेळी तुम्ही या कोर्टात येता,यापुढे अशी याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड (Fine) करू. फक्त तुम्ही एक चांगला वकील (Lawyer) घेऊ शकता. हे न्यायालय प्रभाव असलेल्या लोकांसाठी नाही तर आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) टिपण्णी नुसार याबाबत काही तरी करायला हवं. आपण या देशातील तरुण पिढीचे मानसिकता दूषित करत आहात. OTT सामग्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना मनोरंजनासाठी कशा प्रकारचे पर्याय देत आहात? याशिवाय तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात, असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपुरला झापलं आहे.

 

संबंधित पोस्ट

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी- मंत्री शंभूराज देसाई

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर नवीन महायुती सरकारचा पहिला तर अजित पवारांचा ११ वा अर्थसंकल्प

Wardha: वर्धा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर धावत्या मारुती व्हॅनला आग, कोणतीही जीवित हानी नाही

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

१५ ऑक्टोबर पासून “मराठा आरक्षण बलिदान” रथयात्रेच्या माध्यमातूनमराठा आरक्षणाच्या आक्रमक लढाईस सुरुवात करणार