
ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची घेऊ शकतात शपथ…
विदेश प्रतिनिधी
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या प्रिती पटेल यांनी सोमवारी पंतप्रधानपदासाठी कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून ऋषी सुनक यांना पाठिंबा दिला
ब्रिटनमधील राजकीय अस्थिरतेचे युग संपुष्टात आले. भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली (New UK PM) आहे. लिज ट्रसनंतर आता ब्रिटनची कमान ऋषी सुनक यांच्या हातात असेल. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जाण्यानंतर लिझ ट्रस केवळ 44 दिवस पंतप्रधानपदावर राहू शकल्या. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या प्रिती पटेल यांनी सोमवारी पंतप्रधानपदासाठी कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून ऋषी सुनक यांना पाठिंबा दिला. जॉन्सनने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर पटेल यांनी सुनक यांना पाठिंबा दिला.



