vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई शहरातील गिरगाव मध्ये भीषण आग; अंदाजे 16 दुचाकी, चारचाकींचं नुकसान

मुंबई शहरातील गिरगाव मध्ये भीषण आग; अंदाजे 16 दुचाकी, चारचाकींचं नुकसान…

 

मुंबई प्रतिनिधी

गिरगावच्या आगीमध्ये 5-6 कार आणि 8-10 दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

मुंबई मध्ये गिरगाव (Girgaon) भागात पुंगालिया हाऊस कंपाऊंड मध्ये भीषण भडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये 5-6 कार आणि 8-10 दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या कंपाऊंड मध्ये ठेवलेले लाखो रूपयांचे कपडे, प्लॅस्टिक आणि नायलॉनचे रोल देखील आगीत भस्मसात झाले आहेत. आगीच्या लपेट मध्ये 2 घरांनी देखील पेट घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

आगीचं वृत्त समजाताच तातडीने अग्निशमन दल, रूग्णावाहिका, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये फायर ब्रिगेडला यश आलं आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई मध्ये काल पाडवा आणि भाऊबीज असे दोन्ही सण एकत्र साजरे केले असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडून या सणाचा आनंद लुटला. यंदा कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामध्ये दिवाळी साजरी होत असल्याने 2 वर्षांनी पुन्हा हा सण जल्लोषात साजरा झाला.

संबंधित पोस्ट

महाराष्टरातून श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री.तानाजी घाग यांची नियुक्ती करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा राज्यस्तरावर गौरव