vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना….

मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना….

 

मुंबई प्रतिनिधी

औरंगाबादेत दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत.

मुंबई पाठोपाठ आता औरंगाबाद  जिल्ह्यात देखील गोवरने  तोंड वर काढलयं. दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत. त्यापैकी चौदा बालकांची गोवर चाचणी केली असता दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. पण तरीही ८ बालकांचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही तरी रुग्णसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना दिल्या आहे तसेच भीती बाळगण्यापेक्षा योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात आले आहे. गोवरची लागण झालेल्या एका बालकाचं वय ७ वर्ष तर दुसऱ्याचं ११ वर्ष आहे. तरी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातचं अनेक संशयित रुग्ण आढळून येत आहे. अंगावर लाल पूरळ, ताप, लाल डोळे असी लक्षण आढळून आल्यास आपल्या पाल्यांना लवकरात लवकत रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

मुंबईत (Mumbai) रुग्णसंख्या दिवसेनदिवस वाढतचं आहे. प्रशासनाकडून योग्य काळजी घेण्यात येत असली तरी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबई प्रमाणेच औरंगाबाद  आरोग्य विभाग  देखील हाय अलर्टवर  आहे. जिल्ह्यात गोवरच्या लसीकरणास सुरुवात केली आहे. गोवर आजारावर कुठलाही औषधी उपचार नसल्याने केवळ लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय आहे. तरी तुम्ही तुमच्या पाल्यास गोवर लस न दिल्यास ती ताबडतोब द्यावी असे वाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात 47, अहमदनगर जिल्ह्यात 21, धुळ्यात 2, अकोल्यात 18, पुण्यात 14, लातूरमध्ये दोन, सातारा जिल्ह्यात 6, बुलढाण्यात पाच, अमरावती जिल्ह्यात 7, एक अशा एकूण 126 संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद· १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी ७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी….

vishwatmaklokswamivarta